- श्री. संतोष कोरडे (ICWA )
- प्राचार्य डॉ. वाडेकर एस. के.
- उपप्राचार्य प्रा. संजय वाकचौर
शनिवार,दिनांक 13 ऑगस्ट 2016 रोजी मा. बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे, यांच्या वाणिज्य विभागांतर्गत, वाणिज्य मंडळ 2016-17 चे उद्घाटन झाले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाडेकर एस. के., उपप्राचार्य प्रा. संजय वाकचौरे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. संतोष कोरडे (ICWA ) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. वाळुंज एस. एम. यांनी केले.त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. संतोष कोरडे (ICWA) यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, मा. प्राचार्य ,उपप्राचार्य यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.सदर कार्यक्रमास वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. मोरे एन. के. यांनी सूत्रसंचालन, प्रा. चौगुले एस. एम. यांनी सत्कार निवेदन आणि वाणिज्य मंडळाचे चे चेअरमन प्रा. माने वाय. एस. यांनी आभारप्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.